🕒 1 min read
Housefull 5 Advance Booking : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) 6 जून 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. रिलीजपूर्वीच सुरू झालेल्या बुकिंगमधून केवळ काही तासांत 20,253 तिकीटांची विक्री झाली असून, सुमारे 75.06 लाख रुपयांची कमाई झाली आहे. यासोबतच ब्लॉक सीट्समुळे हा आकडा थेट 3.57 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Stormy response to advance bookings of ‘Housefull 5’
375 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार होणारा ‘हाऊसफुल 5’ हा बॉलिवूडमधील पहिला असा चित्रपट आहे जो दोन वेगवेगळ्या वर्जन्समध्ये (5A आणि 5B) रिलीज होणार आहे. दोन्ही वर्जन्समध्ये वेगळा क्लायमॅक्स असणार आहे.
साजिद नाडियाडवाला यांच्या प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, फरदीन खान, श्रेयस तळपदे, नाना पाटेकर, जैकी श्रॉफ, डिनो मोरिया, चंकी पांडे, जॉनी लीवर आणि निकितिन धीर यांच्याही भूमिका आहेत.
याशिवाय, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिज, नरगिस फाखरी, सोनम बाजवा, चित्रांगदा सिंग आणि सौंदर्या शर्मा यांचाही सहभाग असणार आहे.
‘हाऊसफुल’ फ्रँचायझीच्या याआधीच्या चारही भागांनी एकत्रितपणे 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्यामुळे ‘हाऊसफुल 5’ कडूनही बॉक्स ऑफिसवर मोठ्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही पती-पत्नी होऊच शकत नाही…’; गर्लफ्रेंड गौरी आणि पूर्व पत्नींबद्दल काय म्हणाला आमिर खान?
- मुंबईची ‘ती’ सर्वात मोठी चूक, पंजाब किंग्स विजयी; IPL ट्रॉफीसाठी आरसीबीशी भिडणार!
- पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा 204 धावांचं आव्हान 19 ओव्हरमध्ये पूर्ण करून इतिहास घडवला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





