🕒 1 min read
Housefull 5 : बॉलिवूडमधली लोकप्रिय ‘हाऊसफुल’ फिल्म पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवायला आली आहे. ‘हाऊसफुल 5’ ही फ्रेंचायझीची नवी फिल्म म्हणजे एक भन्नाट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. यंदाही डोकं बाजूला ठेवून, केवळ धमाल विनोदांचा आनंद घेण्याचा अनुभव मिळतो.
फिल्ममध्ये एक श्रीमंत उद्योगपती रंजीत आपल्या मालमत्तेचं हस्तांतरण ‘जॉली’ नावाच्या व्यक्तीच्या नावे करतो. शंभराव्या वाढदिवशी समुद्रातील जहाजावर ही घोषणा होत असतानाच तिथे तीन-तीन जॉलीज येतात आणि एका खुनाची घटना घडते. या खुनाच्या अनाकलनीय गूढामागे दडलेला विनोदी प्रवासचं या फिल्मचं खरं सौंदर्य आहे.
You’ll laugh your ass off after watching ‘Housefull 5’!
चित्रपटाचे दोन वर्जन आहेत, एकात खुन्याचा शोध चालू असतो आणि दुसऱ्यात तो कोणीतरी अनपेक्षित असतो. दोन्ही वर्जनमध्ये मनोरंजनाची मजा तितकीच आहे.
पहिला हाफ भन्नाट आहे, एकाही क्षणी कंटाळा येत नाही. पंचेस जोरदार आहेत. दुसऱ्या हाफमध्ये थोडासा गतीचा अभाव जाणवतो, पण क्लायमॅक्सपर्यंत पोहोचताना पुन्हा हास्याची लाट अनुभवायला मिळते. विशेषतः प्रियदर्शन शैलीची आठवण करून देणारे प्रसंग चांगले जमले आहेत.
अभिनयाच्या बाबतीत अक्षय कुमार पुन्हा एकदा आपल्या सहज विनोदी अभिनयाने रंगत वाढवतो. रितेश देशमुख, नाना पाटेकर आणि सौंदर्या शर्मा यांचे अभिनयही उल्लेखनीय आहेत. सोनम बाजवा देखणं दिसते, तर अभिषेक बच्चन थोडा गंभीर भूमिकेत भाव खाऊन जातो.
लेखक साजिद नाडियाडवाला यांचे लेखन प्रभावी ठरतं, विशेषतः ट्विस्ट आणि विनोदी संवाद लक्ष वेधून घेतात. दिग्दर्शक तरुण मनसुखानी यांनी ही संपूर्ण गोंधळाची कॉमेडी प्रभावीपणे हाताळली आहे. गाणीही बरीच मजेदार असून, ‘लाल परी’ विशेष लक्षात राहते.
ज्या प्रेक्षकांना डोक्याचा वापर न करता केवळ हसण्याचा अनुभव हवा आहे, त्यांच्यासाठी ‘हाऊसफुल 5’ हे परफेक्ट फिल्म आहे. मात्र, अडल्ट संवाद आणि प्रसंग असल्याने लहान मुलांसोबत पाहताना विचार करा.
📌 महत्वाच्या बातम्या
- “दीपिकानं मला प्रपोज केलं होतं, पण मीच तिला सोडलं”; प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा
- IPL 2025 : आयपीएल फायनलमध्ये प्रीति झिंटाची टीम हरली; तरीसुद्धा कमावली दसपट रक्कम
- RCB च्या विजयानंतरच्या जल्लोषात दुर्दैवी चेंगराचेंगरी; 11 बळींवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








