Share

RCB च्या विजयानंतरच्या जल्लोषात दुर्दैवी चेंगराचेंगरी; 11 बळींवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया

During RCB’s IPL victory celebration in Bengaluru, a tragic stampede left 11 dead and 47 injured. Virat Kohli said he was heartbroken, and Anushka Sharma shared an emotional post. Karnataka CM announced compensation and inquiry.

Published On: 

Unfortunate stampede during RCB's post-victory celebrations; Anushka Sharma's first reaction to 11 people died

🕒 1 min read

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या आयपीएलमधील पहिल्या जेतेपदाच्या जल्लोषावेळी (RCB celebration) मोठी दुर्घटना घडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर खेळाडूंना पाहण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीत चेंगराचेंगरी झाली असून, यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि 47 जण जखमी झाले आहेत.

Anushka Sharma’s first reaction to 11 people died

ही घटना बुधवारी दुपारी स्टेडियमबाहेर घडली. स्टेडियमची क्षमता केवळ 35,000 असूनही, दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक लोक या भागात जमा झाल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवरही खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

RCB टीमने अधिकृत निवेदनात या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, “सर्वांच्या सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देतो. आम्ही पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत,” असं म्हटलं आहे.

विराट कोहलीने (Virat Kohli) हीच पोस्ट शेअर करत लिहिलं, “मी नि:शब्द झालोय. अतिशय दु:खी आणि निराश झालोय.” तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) हृदयविदारक इमोजीसह ही पोस्ट शेअर केली. जल्लोषाच्या वेळी अनुष्का टीम बसमध्ये सहभागी होती आणि तिने चाहत्यांची गर्दी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली होती.

दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याचंही सांगितलं. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले असून, भाजपने काँग्रेस सरकारवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!