Share

बंगळुरू चेंगराचेंगरी : सरकारचा मोठा निर्णय, मृतांच्या कुटुंबांना आता २५ लाखांची मदत

Karnataka govt hikes aid to ₹25 lakh for Bengaluru stampede victims; total ₹35L with RCB help.

Published On: 

Bengaluru stampede: Government's big decision, now Rs 25 lakh assistance to families of deceased

🕒 1 min read

बंगळुरू : एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरी (Bengaluru stampede) प्रकरणात ११ आरसीबी चाहत्यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेतला असून मृतांच्या कुटुंबांना जाहीर केलेली मदत १० लाखांवरून थेट २५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

राज्य सरकारने आधी जाहीर केलेल्या १० लाखांच्या मदतीनंतर आता आणखी १५ लाखांची वाढ करून एकूण २५ लाखांची मदत देणार आहे. याशिवाय, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) फ्रँचायजीने देखील प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे एकूण प्रत्येकी ३५ लाख रुपयांची मदत मृतांच्या कुटुंबांना मिळणार आहे.

Bengaluru Stampede : Now Rs 25 lakh assistance to families of deceased

या दुर्घटनेनंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरसीबीच्या मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांच्यासह डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तिघांना अटक केली आहे. केएससीए (Karnataka State Cricket Association) चे सचिव आणि कोषाध्यक्ष यांनी राजीनामे दिले आहेत. या प्रकरणी आधीच RCB, KCSA आणि डीएनए कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

या दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते एच. एम. व्यंकटेश यांनी विराट कोहली याच्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जल्लोषाच्या नशेत आयोजकांनी आणि सेलिब्रिटींनी सुरक्षेची पुरेशी खबरदारी घेतली नाही.

३ जून रोजी आरसीबीने पंजाब किंग्सविरुद्ध अंतिम सामना जिंकून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यानंतर चाहत्यांसाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सोहळ्यातच गर्दीच्या झपाट्यामुळे ११ निरपराध चाहत्यांचा बळी गेला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!