🕒 1 min read
बंगळुरू : आरसीबीच्या (RCB) विजयाचा आनंद काही क्षणातच शोकांतिका ठरला. 4 जून रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 क्रिकेट चाहत्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली असून, आतापर्यंत पोलीस आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाले याला अटक करण्यात आली असून, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
या प्रकरणात नवा वळण म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli) याच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एच. एम. वेंकटेश यांनी क्यूबन पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत विराटवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आयोजनात दुर्लक्ष आणि बेजबाबदारपणामुळे ही शोकांतिका घडल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
Virat Kohli in trouble, complaint filed at police station
3 जून रोजी आरसीबीने पंजाब किंग्सला पराभूत करत 18 वर्षांनंतर पहिलंवहिलं आयपीएल विजेतेपद मिळवलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी मोफत प्रवेशासह सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्यानं गेटवर गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरीत 11 जणांचा बळी गेला.
या संपूर्ण प्रकरणाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली असून, विराटवर गुन्हा दाखल होतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भर पावसात साडीतील ठसकेबाज गौतमी! ‘छमछम नाचूंगी’ गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ व्हायरल
- राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली करोडोंची फसवणूक; अयोध्येतील सायबर घोटाळा उघड
- ठाकरे बंधु एकत्र येणार? मनसैनिकांची राज ठाकरेंना ‘ठाकरे ब्रँड’ वाचवण्याची साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








