Share

राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली करोडोंची फसवणूक; अयोध्येतील सायबर घोटाळा उघड

A ₹3.85 crore scam was busted where fake ‘Ram Mandir prasad’ orders were collected via a fraudulent website.

Published On: 

Ayodhya Police busted ₹3.85 crore scam involving fake Ram temple prasad delivery website.

Ayodhya scam -अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्रसाद’ वितरणाच्या नावावर तब्बल ३.८५ कोटी रुपयांचा सायबर घोटाळा उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकाराचा पर्दाफाश केला असून, हजारो भक्तांची फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष सिंग याने ‘खादी ऑर्गॅनिक डॉट कॉम’ ( khadiorganic.com ) नावाची बनावट वेबसाईट सुरू केली होती. राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ‘फ्री डिलिव्हरी’चा दावा करत लाखो भक्तांकडून प्रसाद, मंदिराच्या भेटवस्तूंच्या नावावर पैसे उकळले गेले. या वेबसाईटवरून ६.३ लाख ऑर्डर्स घेण्यात आल्या आणि प्रत्येक व्यवहारातून ₹५१ ते ₹९९ अशा प्रकारची ‘फीस’ वसूल करण्यात आली.

₹3.85 Crore Ram Temple Prasad Scam Busted in Ayodhya

या घोटाळ्याचा सूत्रधार आशिष सिंग हा अमेरिका स्थायिक असून तो पूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी आहे. हा सगळा प्रकार अमेरिकेतून चालवण्यात येत होता. आशिषने पेमेंट गेटवे वापरून पैसे थेट आपल्या खात्यात घेतले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास केल्यानंतर आरोपीने अयोध्येत हजर होत स्वतःहून आत्मसमर्पण केले.

या प्रकरणी IT कायदा व IPC अंतर्गत कलम 66D आणि IPC च्या 419, 420, 467, 468, 471, आणि 120B विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस तपास सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही