🕒 1 min read
गडचिरोली (प्रतिनिधी) — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांचा दौरा केला. “गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री नाही,” असं सांगत त्यांनी आपली उपस्थिती पुन्हा अधोरेखित केली आणि नक्षलप्रभावित भागात माओवादी चळवळ संपवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
कवंडे पोलिस आऊटपोस्टच्या भेटीदरम्यान त्यांनी सुरक्षा यंत्रणांचं काम पाहिलं आणि स्थानिक पातळीवर सरकारी योजना पोहचण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख केला. “आता या भागात माओवादी कारवाया शक्य होणार नाहीत,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
Devendra Fadnavis visited Gadchiroli
या दौऱ्यात गडचिरोली पोलिस दलातर्फे आयोजित १३ आत्मसमर्पित नक्षलवादी युवक-युवतींच्या सामूहिक विवाह सोहळ्यास ते साक्षीदार होते. मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधर यासह इतरांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. पोलीस बँड पथकाच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, गडचिरोलीत औद्योगिक विकासाला चालना दिली जाणार असून, “जल, जंगल आणि जमीन वाचवतच विकास घडवायचा आहे,” असं त्यांनी नमूद केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘हाऊसफुल 5’ पाहून हसून हसून पोट दुखेल! अक्षय, नानाची धमाल कॉमेडी पाहाच!
- “दीपिकानं मला प्रपोज केलं होतं, पण मीच तिला सोडलं”; प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा
- IPL 2025 : आयपीएल फायनलमध्ये प्रीति झिंटाची टीम हरली; तरीसुद्धा कमावली दसपट रक्कम