Share

“दीपिकानं मला प्रपोज केलं होतं, पण मीच तिला सोडलं”; प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा

Muzammil Ibrahim reveals Deepika Padukone once proposed to him and they dated for two years.

Published On: 

"Deepika proposed to me, but I left her"; Famous actor's sensational claim

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या तिच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच दरम्यान आता एक जुना अध्याय पुन्हा समोर आला आहे. अभिनेता आणि मॉडेल मुजम्मिल इब्राहिमनं (Muzammil Ibrahim) नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकासोबतच्या नात्याविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.

सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या मुजम्मिल इब्राहिमनं असा दावा केला की, दीपिकानं करिअरच्या सुरुवातीला त्याच्याशी प्रेमसंबंध ठेवले होते आणि तीच त्याच्या प्रेमात पडली होती. इतकंच नाही, तर दीपिकानंच त्याला प्रपोज केलं होतं आणि तो तिचा मुंबईतील पहिला जवळचा मित्र होता.

“Deepika proposed to me, but I left her”

“आम्ही आमच्या मॉडलिंगच्या काळात डेट करत होतो. ती खूप छान मुलगी आहे. आमची ओळख एका फॅशन शोदरम्यान झाली. तिनं मला आधी ‘ग्लॅड्रॅग्स’ आणि ‘परदेसिया’ मध्ये पाहिलं होतं. ती माझ्यावर फिदा झाली होती. आम्ही जवळपास दोन वर्षे एकत्र होतो. पण ब्रेकअप मीच केलं, कारण मी त्यावेळी आधीपासून स्टार होतो आणि ती अजून स्थिर नव्हती,” असंही त्यानं स्पष्ट केलं.

मुजम्मिलनं सांगितलं की, ब्रेकअपनंतरही त्यांचं नातं तुटलं नाही. दोघेही अनेक वर्षं संपर्कात होते. “लग्नाआधीपर्यंत आमचं बोलणं सुरू होतं. ती नेहमीच गोड आणि आदरपूर्वक वागायची. आम्ही एकमेकांचं कौतुक करायचो,” असंही तो म्हणाला.

त्याच्या आठवणींमध्ये एक खास क्षण देखील आहे – “पावसात आम्ही एकदा रिक्षातून फिरत होतो. मी ड्रायव्हरला तिचं आवडतं गाणं लावायला सांगितलं. आणि त्यानं तेच गाणं दीड तास लावलं होतं. ती खूप आनंदी झाली होती.”

दीपिकानं 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंगशी लग्न केलं आणि 2024 मध्ये ती एका गोंडस मुलीची आई झाली. सध्या ती तिचं कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्य उत्तम प्रकारे सांभाळते आहे. पण मुजम्मिलच्या या भावूक आठवणींमुळे दीपिकाच्या जुन्या नात्यांवर पुन्हा एकदा चर्चेचा फवारा उडालाय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही