🕒 1 min read
IPL 2025 : IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा दणदणीत पराभव केला. सामन्यानंतर पंजाबची सहमालकीण प्रीति झिंटा (Preity Zinta) भावूक झालेली दिसली. मात्र, तिच्या अश्रूंआड लपलेली होती एक मोठी आर्थिक यशकथा.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीति झिंटानं 2008 साली पंजाब किंग्जमध्ये 35 कोटी रुपयांची गुंतवणूक करत 23-32% शेअर विकत घेतला होता. टीमच्या वाढलेल्या ब्रँड व्हॅल्यूमुळे आता तिचा हिस्सा 10 पट वाढून तब्बल 350 कोटी रुपयांचा झाला आहे.
Preity Zinta earned ten times the amount in the IPL final
टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पंजाब किंग्जची 2022 मध्ये एकूण किंमत सुमारे 925 मिलियन डॉलर्स इतकी होती. यानुसार, झिंटाच्या भागीदारीचा बाजारमूल्य अंदाजे 350 कोटींवर पोहोचतो.
प्रीति झिंटाचं हे आर्थिक यश तिच्या बॉलिवूड कारकीर्दीइतकंच भव्य आहे. 500 कोटींहून अधिक संपत्तीची मालकीण असलेली प्रीति सध्या अमेरिकेत स्थायिक आहे. तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असून, ब्रँड एंडोर्समेंट्स, रिअल इस्टेट गुंतवणूक आणि IPL टीम भागीदारीतून ती मोठा नफा कमवत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- RCB च्या विजयानंतरच्या जल्लोषात दुर्दैवी चेंगराचेंगरी; 11 बळींवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया
- हा प्रसिद्ध अभिनेता RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहलीसाठी मंदिर बांधणार?
- आईपीएल 2025 फायनलमध्ये पंजाबचा पराभव, प्रीति झिंटा रडली; चाहत्यांचे मन हेलावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








