Share

जगात युद्ध थांबवण्याची ताकद फक्त मोदींमध्येच? फडणवीसांनी सांगितली आतली बातमी!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इराण मुद्यावरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय. तर गॅस टंचाईच्या रांगा हे केवळ काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Published On: 

CM Devendra Fadnavis speaking about PM Modi and Iran conflict

नागपूर: इराण आणि अमेरिकेच्या वाढत्या युद्धामुळे आता महाराष्ट्रातही राजकारण चांगलंच तापलं आहे. जागतिक व्यापाराची जीवनवाहिनी मानली जाणारी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ सध्या जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनली आहे. अशा तणावपूर्ण वातावरणातही इराणने केवळ भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला आहे. याच मुद्यावरून मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे. 

जगातला कोणताही संघर्ष थांबवण्याची ताकद आज फक्त मोदींमध्ये आहे, असं खुद्द अमेरिकेचे नेतेही मान्य करत आहेत. त्यामुळेच आपल्या देशातील बडबड आणि फडफड करणाऱ्या नेत्यांनी आता तरी गप्प बसावं, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

Devendra Fadnavis attacks Congress over gas shortage

दुसरीकडे, आखाती देशांतील तणावामुळे राज्यात गॅस आणि इंधन टंचाईच्या अफवा पसरल्या आहेत. यावरून त्यांनी थेट काँग्रेसलाच टार्गेट केलं आहे. राज्यात गॅसचा कोणताही तुटवडा नाही, तरीही एजन्सीबाहेर ज्या रांगा दिसत आहेत, ते केवळ काँग्रेसचं मोठं षडयंत्र असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट त्यांनी केला.

“लोकांमध्ये मुद्दाम पॅनिक निर्माण करण्याचं काम काँग्रेस करत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. जेव्हा त्यांना या आरोपांचे पुरावे विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी थेट काँग्रेस नेत्यांची नावेच घेतली.

स्वतः राहुल गांधी, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हेच लोकांमध्ये भीती पसरवत आहेत, यापेक्षा आणखी काय पुरावे हवेत? असा प्रतिसवाल करत त्यांनी विरोधकांची अक्षरशः बोलती बंद केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या इंधन आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून, सरकारने रेशनिंगसारखा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही