Share

छगन भुजबळांची मोठी घोषणा! गॅससाठी रांगा लावताय? थांबा, ही बातमी आधी वाचाच…

इराण युद्धामुळे राज्यात गॅस टंचाईच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत जनतेला दिलासा दिला आहे.

Published On: 

LPG Gas Cylinder shortage rumors cleared by Minister Chhagan Bhujbal in Maharashtra

🕒 1 min read

LPG Gas Cylinder : इराण आणि इस्रायल-अमेरिकेतील वाढत्या संघर्षामुळे सध्या जगात भितीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारतात गॅस आणि इंधनाचा भीषण तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी लोकांनी अक्षरशः लांबच लांब रांगा लावल्याने एकच खळबळ उडाली. पण आता यावर थेट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या अफवांवरून भुजबळांनी थेट जनतेला आवाहन केलं आहे. “राज्यात घरगुती एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

LPG Gas Cylinder shortage rumors cleared by Chhagan Bhujbal

सध्या राज्याची रोजची मागणी ९,००० मेट्रिक टन इतकी आहे. मात्र, सुरळीत पुरवठ्यासाठी मागणीपेक्षा जास्त म्हणजेच ११,००० मेट्रिक टनांपर्यंत उत्पादन वाढवण्यात आलं आहे. त्यामुळेच, गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत मार्चमध्ये सर्वाधिक गॅस उपलब्ध असल्याचा दावा सरकारने केला आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलचा साठाही मुबलक असून राज्यातील रिफायनरी पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.

यातच, काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या नेमण्यात आल्या आहेत. रुग्णालये आणि शाळांना गॅस पुरवठ्यात पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे.

सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे, गॅस मिळण्यात काहीही अडचण आल्यास आता नागरिकांना थेट व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार करता येणार आहे. तालुका आणि जिल्हा स्तरावर यासाठी विशेष नियंत्रण कक्ष तातडीने सुरू करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!