Share

Gold Price Drop : इराण-इस्रायल युद्ध पेटलं अन् सोन्याचे भाव कोसळले; बाजारात अचानक असं काय घडलं?

इराण-इस्रायल युद्धाच्या भडक्यातही सोन्याचे भाव चक्क कोसळले आहेत. डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

Published On: 

Gold Price Drop: सोन्याचे भाव का कोसळले?

युद्ध म्हटलं की सोन्याला झळाळी येणार, हा आजवरचा शेअर बाजाराचा अलिखित नियम. पण सध्या इराण आणि इस्रायलमध्ये भडकलेल्या युद्धात नेमकं उलटं घडतंय, ज्याने गुंतवणूकदारांची चांगलीच झोप उडवली आहे.

सध्या अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले सुरू आहेत. युद्धाला आता १५ दिवस उलटून गेलेत. अशा आणीबाणीच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून नेहमी सोनं खरेदीकडे धाव घेतात. पण यावेळी सोन्याचे भाव (Gold Price Drop) वाढण्याऐवजी चक्क खाली कोसळताना दिसत आहेत.

Gold Price Drop

आकडे पाहिले तर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झालं तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं ५४२६ डॉलर प्रति औंस या उच्चांकी पातळीवर होतं. मात्र मध्यपूर्वेत एवढा मोठा तणाव असूनही ते आता थेट ५१०८ डॉलरवर आदळलंय.

भारतीय बाजारातील परिस्थितीही याहून वेगळी नाही. MCX (Multi Commodity Exchange) वर २८ फेब्रुवारीला १.६७ लाख रुपये प्रति १० ग्रॅम असलेला सोन्याचा दर आता १.५९ लाखांवर घसरला आहे.

चांदीनेही गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे. २.८९ लाख रुपये प्रति किलोवरून चांदी १३ मार्च रोजी थेट २.६२ लाखांवर आली आहे. त्यामुळे बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं असं का घडतंय? शेअर बाजार तज्ज्ञांच्या मते, या मोठ्या पडझडीमागे U.S. Dollar Index ची ताकद आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने सोने खरेदी खूप महाग झाली आहे.

परिणामी, तात्पुरत्या स्वरूपात बाजारात सोने आणि चांदीची मागणी घटली आहे. युद्धाची धग आणि कच्च्या तेलाच्या अस्थिर किमती असूनही, अमेरिकन डॉलरच्या दबदब्यामुळे सोन्याची चमक सध्या तरी फीकी पडली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही