🕒 1 min read
बीड | प्रतिनिधी – जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गीता गावातील शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात एक नवा धक्कादायक तपशील समोर आला आहे. या प्रकरणातील पाचवा आरोपी भाजपच्या धारूर तालुक्याचा अध्यक्ष संदीप काचगुंडे असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तो फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शुभांगी शिंदे हिने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या माहेरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑप्टिकल दुकानासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सातत्याने तिचा छळ करण्यात येत होता. आधीच पाच लाख रुपये दिले होते, तरीही आणखी चार लाखांची मागणी सुरूच होती.
BJP Leader Linked to Shubhangi Shinde Suicide Case in Beed
या प्रकरणात पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे, नणंद सीमा शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप काचगुंडे नावाचा भाजप पदाधिकारी अद्याप फरार आहे. त्याला फरार होण्यासाठी कोणाचे राजकीय पाठबळ मिळाले का? यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. बर्दापूर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी विशेष पथक रवाना केल्याची माहिती दिली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गडचिरोलीत माझ्याएवढा फिरलेला मुख्यमंत्री नाही – फडणवीसांचा माओवाद्यांवर निर्णायक इशारा
- ‘हाऊसफुल 5’ पाहून हसून हसून पोट दुखेल! अक्षय, नानाची धमाल कॉमेडी पाहाच!
- “दीपिकानं मला प्रपोज केलं होतं, पण मीच तिला सोडलं”; प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक दावा













