शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५००० रुपयांची अग्रीम मदत बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

शासनाने जाहीर केलेल्या ५००० रुपयांच्या अग्रीम दुष्काळी मदतीचे वाटप सुरू झाले असून, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जात आहेत.

Published On: 

Information about 5000 rupees advance drought relief help for farmers in Maharashtra.

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: बळीराजाची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीचे वाटप अखेर सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जात असून, सोलापूर जिल्ह्यातून या दुष्काळी मदतीला सुरुवात झाली आहे.

बार्शी तालुक्यातील तांदळवाडी गावातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ही मदत देण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात तब्बल ९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या दुष्काळी मदतीचा लाभ मिळणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही अग्रीम मदत जमा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली आहे.

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, एकूण ३०४ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ निवारणासाठी राबवल्या जात असलेल्या या उपाययोजनांतर्गत, आता सोलापूरव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनाही लवकरच ही अग्रीम मदत दिली जाणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही