गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; थेट मराठवाड्यात नियुक्ती, राजकीय वर्तुळात चर्चा

गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांची राज्य सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे बदली केली असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Published On: 

Gokul Election returning officer transferred to Chhatrapati Sambhajinagar

कोल्हापूर, 1 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान (Gokul Election) एक मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारने गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांची तडकाफडकी बदली केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार ३१ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशात, त्यांना अपर जिल्हाधिकारी (गट-अ) पदी तात्पुरती पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांची नवी नियुक्ती छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) म्हणून करण्यात आली असून, ऐन निवडणुकीच्या टप्प्यात घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय आणि सहकार वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

मोसमी बर्डे चौगुले सध्या निवडणुकीच्या अधिसूचित पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे भारत निवडणूक आयोगातर्फे सुरू असलेली ‘विशेष सखोल मतदार पुनरीक्षण’ मोहीम पूर्ण होईपर्यंत त्यांना कोल्हापूर येथील सध्याच्याच पदावर काम करावे लागणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार पुनरीक्षणाची प्रक्रिया संपल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतरच त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील नव्या पदाचा कार्यभार स्वीकारता येईल, असे या शासन आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या मोठे घमासान सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला १३ तर महायुतीला १२ जागा मिळाल्या आहेत. मात्र, अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी १४ जणांच्या उपस्थितीचा कोरम महत्त्वपूर्ण असल्याने काल ही निवडणूक होऊ शकली नाही. यानंतर, अध्यक्ष निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम पूर्ण असण्याची आवश्यकता नसल्याचा दावा करत समविचारी आघाडीच्या १३ संचालकांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली.

या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने सरकारसह महायुतीच्या बाराही संचालकांना प्रतिवादी करत, कालच्या पहिल्या सभेला अनुपस्थित राहिलेल्या महायुतीच्या या १२ संचालकांना उपस्थित राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. या घडामोडींनंतर महायुतीकडून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली असून, गोकुळ अध्यक्ष पदाच्या निवडीच्या पुढील बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही