Share

ठाकरे बंधु एकत्र येणार? मनसैनिकांची राज ठाकरेंना ‘ठाकरे ब्रँड’ वाचवण्याची साद

Will Raj and Uddhav Thackeray reunite to protect the ‘Thackeray brand’ in Maharashtra?

Published On: 

MNS spokesperson Prakash Mahajan claims Sanjay Raut is creating hurdles in a potential alliance between Raj Thackeray and Uddhav Thackeray. His repeated remarks are blocking unity efforts.

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमध्ये संवादाची नवी शक्यता दिसतेय. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत एकत्र येण्याची भूमिका सूचित केल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनीही अलीकडेच एका कार्यक्रमात अशाच पद्धतीचे संकेत दिले. यानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, ‘ठाकरे ब्रँड’ पुन्हा एकत्र यावा, ही भावना जोर धरू लागली आहे.

आज शिवतीर्थावर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन, ‘ठाकरे ब्रँड’ वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी साद घातली. मनसेचे पदाधिकारी म्हणाले की, दोन भावांमध्ये दुरावा निर्माण झाल्याने परप्रांतीय राजकारण्यांना विशेषतः किरीट सोमय्या आणि कंगना राणावतसारख्या लोकांना राज्यात उगाचच राजकीय व सामाजिक प्रभाव वाढवण्यास संधी मिळाली. ही स्थिती ठाकरे बंधूंनी एकत्र येऊनच थांबवावी, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.

Thackeray Brand Must Survive, Say MNS

केंद्रीय समितीचे अध्यक्ष संजय जामदार यांनीही हीच भावना स्पष्ट करत म्हटलं, “राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीत आम्ही ही भूमिका मांडली. राज्यात ठाकरे ब्रँड असायलाच हवा. तो तुटल्यामुळेच बाहेरच्यांची दादागिरी वाढली आहे.”

दुसरीकडे, मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक कॉल करावा, असं आवाहन केलं आहे. “राज ठाकरे शंभर पावलं पुढे येतील,” असंही ते म्हणाले. संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावरही हलकी टीका करत म्हटलं, “ते कॅमेरासमोर जसे बोलतात, तसेच प्रत्यक्षातही सकारात्मक पावलं टाकावीत.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही