Share

भर पावसात साडीतील ठसकेबाज गौतमी! ‘छमछम नाचूंगी’ गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ व्हायरल

Watch Gautami Patil viral rain dance on Chham Chham song in a saree, fans flooding likes and comments.

Published On: 

Gautami looks stunning in a saree in heavy rain! Video of her dancing to the song 'Chhamchham Nachungi' goes viral

🕒 1 min read

Gautami Patil : लोकप्रिय लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. अलका याग्निक यांच्या प्रसिद्ध “छमछम नाचूंगी” (Chham Chham song) या गाण्यावर गौतमीने भर पावसात डान्स करताना साडी नेसलेला लूक दाखवला आहे. तिच्या उत्साही आणि ठसकेबाज स्टेप्समुळे व्हिडीओवर प्रेक्षकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

नृत्यशैलीमुळे नेहमी चर्चेत राहणारी गौतमी काही वेळा टीकेलाही सामोरी गेली आहे. पण मेहनतीच्या जोरावर तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. सोशल मीडियावर तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय.

Gautami looks stunning in a saree in heavy rain!

गौतमीने आतापर्यंत अनेक मराठी गाण्यांमध्ये नृत्य केलं आहे. ‘कृष्ण मुरारी’, ‘तंबू पिरमाचा पेटला’, ‘बापाचा बाप येतोय’, ‘चंद्रावानी रूप माझं’, ‘सरकार तुम्ही केलाय मार्केट जाम’ ही तिची काही गाजलेली गाणी. प्रत्येक गाण्यात तिच्या नृत्यशैलीचा वेगळा ठसा उमटलेला दिसतो.

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा गावातून आलेली गौतमी पाटील, आर्थिक अडचणींना सामोरे जात लावणी क्षेत्रात आली. वडिलांच्या गैरहजेरीत आणि आईच्या अपघातानंतर घराची जबाबदारी तिच्यावर आली होती. पहिल्यांदा बॅकडान्सर म्हणून ५०० रुपयांपासून सुरुवात केलेल्या गौतमीला आज एका शोसाठी सुमारे २ लाख रुपये मिळतात. दरमहा ती २० ते २५ कार्यक्रम करते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Entertainment India Maharashtra Marathi News Mumbai

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या