🕒 1 min read
बंगळुरू : आरसीबीच्या (RCB) ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात एका दुर्दैवी घटनेने गालबोट लागलं. ४ जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असून ४७ जण जखमी झाले आहेत. गर्दीच्या तडाख्यात जीव गमावणाऱ्यांचा आक्रोश आणि प्रत्यक्षदर्श्यांचे अनुभव थरकाप उडवणारे आहेत.
या परेडसाठी मैदानाबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. गर्दी वाढत गेली, गेट क्रमांक १ उघडलं आणि क्षणार्धात लोक धावत गेले. तीन तरुणी पडल्या आणि त्यानंतर अफाट गर्दीत चेंगराचेंगरी झाली.
“People were dying, crying for water!”; RCB Victory Parade
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं, “मी माझ्या मुलासाठी चिंतेत होतो. त्याच्याशी संपर्क होत नव्हता. अखेर तो सुरक्षित असल्याचा मेसेज आला तेव्हा जीव भांड्यात पडला.”
तो पुढे सांगतो, “लोक पाण्यासाठी तडफडत होते. रडत होते. काहीजण तर मदतीसाठी आरडाओरडा करत होते. त्या ठिकाणी कुठलीही प्रथमोपचार सेवा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.”
पोलिसांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात आणली नसती, तर मृतांचा आकडा शंभराच्या वर गेला असता, असंही त्याने म्हटलं.
ही घटना संध्याकाळी ४.४५ वाजता घडली. तिकिटधारकांसाठी स्टेडियम उघडलं जात असताना, गेटवर अफाट गर्दी उसळली आणि गोंधळ उडाला.
मुख्यमंत्र्यांनी मृतांचा आकडा जाहीर केला आहे आणि कारवाई सुरू असल्याचं सांगितलंय. पण, एवढा मोठा कार्यक्रम असूनही प्रशासनाने तयारी का केली नाही, असा सवाल उपस्थित होतो आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विजयाच्या जल्लोषात ११ मृत्यू! विराट कोहली अडचणीत, पोलीस स्थानकात तक्रार दाखल
- भर पावसात साडीतील ठसकेबाज गौतमी! ‘छमछम नाचूंगी’ गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ व्हायरल
- राम मंदिराच्या प्रसादाच्या नावाखाली करोडोंची फसवणूक; अयोध्येतील सायबर घोटाळा उघड