🕒 1 min read
लखनऊ – IPL 2025 च्या 61व्या ( SRH vs LSG ) सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) सामना होणार असून, LSG कडून कोणती Playing 11 मैदानात उतरेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना 19 मे रोजी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाईल.
🏏 LSG ची संभाव्य Playing 11 vs SRH:
सलामीवीर: एडन मार्करम, मिचेल मार्श. या दोघांवर सुरुवातीला चांगली भागीदारी करण्याची जबाबदारी असेल. मार्शला फॉर्ममध्ये परत येणे आवश्यक आहे.
मध्यफळी व अष्टपैलू खेळाडू: निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद
LSG च्या मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू (पंत, पूरन, मिलर) अद्याप अपेक्षित कामगिरी करू शकलेले नाहीत. याउलट, बडोनी आणि समद यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
गोलंदाज: आकाश दीप, आवेश खान, आकाश सिंग, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव
वेगवान गोलंदाज मयंक यादव दुखापतीमुळे हंगामाबाहेर गेला असल्याने LSG ला मोठा धक्का बसला आहे. त्याऐवजी रवी बिश्नोईला संधी दिली जाऊ शकते. प्रिन्स यादव आणि आकाश सिंग यांनी गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती. बिश्नोई आणि राठी या दोघांवर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल.
IPL 2025 SRH vs LSG Playing 11
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: LSG vs SRH सामना कुठे आणि कसा पाहाल मोफत? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रिमिंग माहिती
- IPL 2025: LSG vs SRH सामना – लखनौमध्ये उष्ण हवामान, धीम्या खेळपट्टीवर मोठा स्कोअर कठीण
- IPL 2025: SRH vs LSG सामना – लखनऊचं वरचष्मा कायम, प्लेऑफसाठी महत्त्वाचा टप्पा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now