Share

जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यावर मुंबईचा लखनौवर ५४ धावांनी सलग पाचवा विजय

IPL 2025 | Jasprit Bumrah fiery four-wicket haul helped Mumbai Indians crush Lucknow Super Giants by 54 runs at Wankhede, securing their fifth consecutive win and climbing to the second spot on the points table.

Published On: 

Jasprit Bumrah miss first two weeks of IPL 2025

🕒 1 min read

IPL 2025 | मुंबई | २७ एप्रिल: जसप्रीत बुमराहच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी दणदणीत पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने सलग पाचवा विजय मिळवत गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर २० षटकांत २१५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ १६१ धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेत लखनौच्या डावाला खिंडार पाडलं. ट्रेंट बोल्टने ३, विल जॅक्सने २ आणि कॉर्बिन बॉशने १ विकेट घेतली.

मुंबईच्या डावात रायन रिकल्टनने ३२ चेंडूत ५८ धावा फटकावत जोरदार सुरुवात केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवने जबरदस्त फटकेबाजी करत २८ चेंडूत ५४ धावा करत संघाला मजबूत स्थितीत नेलं. अखेरच्या षटकांत नमन धीर आणि कार्बिन बॉश यांनी मुंबईचा स्कोअर २१५ पर्यंत नेला.

IPL 2025 | Mumbai Indians Beat Lucknow Super Giants by 54 Runs

लखनौच्या डावाची सुरुवात खराब झाली. एडन मारक्रम आणि मिचेल मार्शने थोडा प्रतिकार केला, पण जसप्रीत बुमराह आणि विल जॅक्स यांच्या भेदक गोलंदाजीसमोर लखनौचा डाव कोसळला. बुमराहने १६व्या षटकात सलग विकेट्स घेत मुंबईचा विजय निश्चित केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही