Share

“आमच्याकडे १३० अणुबॉम्ब, सजवून ठेवण्यासाठी नाहीत”; पाकिस्तानची भारताला धमकी

After the Pahalgam attack, Pakistani leaders have escalated tensions with India. Railway Minister Hanif Abbasi threatened nuclear action if India blocks Pakistan’s water. Earlier, Bilawal Bhutto-Zardari had also issued a stern warning regarding the Indus River.

Published On: 

Pahalgam terror attack ॰ Pahalgam attack

दिल्ली | २७ एप्रिल: जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांनी भारताला धमकी देण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी अणुहल्ल्याची उघड धमकी दिली आहे. त्यांनी म्हटलं, “भारताने जर पाकिस्तानच्या पाण्यावर गदा आणली, तर आमच्याकडे असलेली १३० अण्वस्त्रे आणि घौरी, शाहीन, गझनवी क्षेपणास्त्रे भारतासाठीच सज्ज आहेत.” भारताने सिंधू नदीचं पाणी रोखल्यास युद्धाला तयार राहावं, असा इशाराही त्यांनी दिला.

After Pahalgam Attack, Pakistan Threatens India With Nuclear Strike Over Water Dispute

याआधी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनीही भारताला धमकावलं होतं. सिंधू नदीच्या मुद्द्यावरून त्यांनी भारताला ‘पाणी वाहील किंवा रक्त’ असा थेट इशारा दिला होता. भुट्टो म्हणाले होते, “सिंधू नदी आमची आहे, आणि ती आमचीच राहील.”

या वक्तव्यांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही