🕒 1 min read
वॉशिंगटन – भारताने पाकिस्तानातील तीन प्रमुख एअरबेसवर हल्ला करून शांततेच्या वाटाघाटींसाठीची शक्यता संपवली होती, असा धक्कादायक दावा CNN पत्रकार Nick Robertson यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर आणि भारतीय लष्करी तळांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. इस्लामाबादजवळील एअरबेसवर हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत शस्त्रसाठे, लष्करी तळ आणि एअर ट्रॅफिक केंद्रे लक्ष्य केली.
CNN च्या रिपोर्टनुसार भारताला हल्ल्यांचे गांभीर्य समजायला वेळ लागला आणि त्यानंतर भारताने अमेरिका, सौदी अरेबिया आणि तुर्कस्तानसारख्या देशांशी संपर्क साधला. याच पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी राजनैतिक मध्यस्थीला प्रतिसाद दिला. भारताने थांबण्याचे आश्वासन दिले, पण पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार काही वेळाने नंतर पुन्हा गोळीबार झाला.
India, Not Pakistan, Requested US Help for Ceasefire? CNN Report Puts Modi Govt in Trouble
सोशल मीडियावर मोदी सरकारवर टीकेची झोड उठली असून, सरकारने नागरिकांपासून सत्य लपवले असल्याचा आरोप होत आहेत. भारतीय नागरिकांनी मोदी सरकारकडून पारदर्शकतेची मागणी केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानने काश्मीरमधून येणाऱ्या तीन नद्यांचे पाणी थांबवल्याचा आरोप भारतावर केला आहे. या नद्या पाकिस्तानसाठी जीवनरेषा मानल्या जातात. भारत – पाकिस्तान तणाव वाढत असून, परिस्थिती अजूनही संवेदनशील आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- “युद्धविराम उल्लंघनाचा प्रश्नच उद्भवत नाही”; पाकिस्तानने भारताचे आरोप फेटाळले
- पाकमध्ये राफेल आणि मिराजचा मलबा सापडला; अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टच्या खुलास्याने भारतात खळबळ
- भारतीय लष्कर स्फोट नाकारतो पण मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या ट्वीटने संभ्रम; तर गोळीबारीत BSF चा जवान शहीद