Share

पाकमध्ये राफेल आणि मिराजचा मलबा सापडला; अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टच्या खुलास्याने भारतात खळबळ

India’s Air Force may have lost two jets — a Rafale and a Mirage 2000 — during strikes in Pakistan. Visuals show debris and parts of jets. No official comment from India yet.

Published On: 

India's Air Force may have lost two jets — a Rafale and a Mirage 2000 — during strikes in Pakistan. Visuals show debris and parts of jets. No official comment from India yet.

🕒 1 min read

नवी दिल्ली – पाकिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान भारताने दोन फायटर जेट्स गमावल्याचा गंभीर दावा अमेरिकेतील The Washington Post ने केला आहे. या हल्ल्यांनंतर सोशल मीडियावर आलेल्या व्हिज्युअल्सच्या आधारे वॉशिंग्टन पोस्टने ही माहिती प्रसिद्ध केली आहे. या रिपोर्टनुसार, भारताच्या अत्याधुनिक राफेल आणि मिराज 2000 फायटर जेट्सचा मलबा पाकिस्तान आणि पाक-अधिकृत काश्मीरमध्ये सापडल्याचे स्पष्ट दिसून येते.

भारत सरकार किंवा भारतीय लष्कराकडून यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप आलेले नाही. मात्र, पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे की त्यांनी ५ भारतीय फायटर जेट्स पाडले. अमेरिकेतील The Washington Post च्या दाव्यावर भारताकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

📌 India may have lost Rafale, Mirage 2000 jets in Pakistan strikes, claims Washington Post

  • वॉशिंग्टन पोस्टने व्हिज्युअल एव्हिडन्सच्या आधारे सांगितले की, एक राफेल आणि एक मिराज 2000 जेट कोसळले असण्याची शक्यता आहे.

  • “Rafale” लिहिलेला स्टॅबिलायझर आणि “BS 001” कोड सापडला, जो भारतीय वायुसेनेच्या राफेलवर 2021 मध्ये वापरण्यात आला होता.

  • Wuyan (काश्मीर) येथे एका शाळेवर जेट कोसळल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले.

  • Akalia Khurd (पंजाब) येथे मिराज किंवा राफेलवर बसणाऱ्या फ्रेंच बनावटीच्या MICA क्षेपणास्त्राचा न जळालेला भाग आढळला.

  • Akhnoor (जम्मू) येथे आणखी एका अपघातस्थळाची नोंद.

स्फोटके नाश करणारे अमेरिकन लष्कराचे माजी तज्ञ ट्रेव्हर बॉल, फ्रेंच संरक्षण संस्था आणि Dassault च्या तज्ञांनी या दृश्यांची पडताळणी केली. त्यांनी असेही सांगितले की, जेट कोसळले की पाडण्यात आले हे निश्चित करता आलेले नाही.

🤐 भारत सरकारची शांतता:

या प्रकरणावर भारत सरकारकडून कोणतीही पुष्टी किंवा नकार आलेला नाही. “संकटाच्या काळात भारत सरकार ऑपरेशनल डिटेल्सवर फार बोलत नाही,” असे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी स्पष्ट केलं.

💥 राजकीय संदेश आणि संघर्षाचं गांभीर्य:

ही घटना भारतासाठी हवाई लढाईतील सर्वात मोठी तांत्रिक हानी ठरू शकते. 2019 नंतर प्रथमच भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष एवढ्या टोकाला गेला आहे. भारताने नुकत्याच काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानातील लक्ष्यांवर हल्ले सुरू केले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra India Marathi News

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या