Share

पाकव्याप्त काश्मीर भारताला मिळालाच पाहिजे; गरज भासल्यास पाकिस्तान ताब्यात घ्या – रामदास आठवले

Ramdas Athawale says PoK must be returned to India, even if it means taking control of Pakistan. He also confirms the inter-caste marriage scheme will continue.

Published On: 

Narendra Modi Is Not a Divine Incarnation - Ramdas Athawale

दिल्ली – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. “पाकिस्तान हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात यायलाच हवा. गरज भासली, तर पाकिस्तानलाच ताब्यात घेण्याची वेळ येऊ शकते,” असं ठाम विधान त्यांनी केलं.

“डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आदर आहे, पण कोणाच्याही मध्यस्थीची भारताला गरज नाही. आम्ही थेट पाकिस्तानसोबत बोलायला तयार आहोत, पण त्याआधी पाकने दहशतवादी कारवाया थांबवाव्यात आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला सोपवावा,” अशी भूमिका आठवलेंनी मांडली. त्यांनी असंही नमूद केलं की, “युद्धविरामाची विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली आहे, म्हणजे त्यांनी हार मान्य केली आहे.”

Ramdas Athawale Demands PoK Return

दरम्यान, आंतरजातीय विवाह मदत योजना बंद होणार नाही, असं स्पष्ट करत आठवलेंनी सांगितलं की, “दरवर्षी अडीच लाख आंतरजातीय विवाह होतात. त्यामुळे समाज एकत्र येतोय.”

संजय शिरसाट यांनी समाजकल्याण विभागाच्या निधीविषयी केलेल्या वक्तव्यावर देखील आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. “गोरगरिबांच्या हितासाठी असलेला निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवणं चुकीचं आहे. अन्य खात्यांचा निधी वळवावा, समाजकल्याण खात्याचा नव्हे. कर्नाटकात असे कायदे आहेत की अशा निधीचा वापर अन्यत्र करता येत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही