शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय; शिंदेंच्या शिवसेनेत घमासान

Maharashtra’s Parbhani district sees a major dispute in Eknath Shinde’s Shiv Sena after Anand Bharose’s appointment as district head. Party workers oppose the move, claiming BJP influence.

Published On: 

Two arrested for threatening shiv sena Eknath Shinde

परभणी – जिल्ह्यात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून जोरदार वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने आनंद भरोसे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र, याला मावळते जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे आणि त्यांच्या समर्थकांचा तीव्र विरोध आहे.

परभणी शिवसेनेत जिल्हाध्यक्ष निवडीवरून गोंधळ; व्यंकट शिंदेंचा भाजपवर थेट आरोप

व्यंकट शिंदे यांनी आरोप केला की, “ही निवड ही भाजपशी जवळीक साधण्यासाठीच झाली असून, ही संपूर्ण परभणी शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न आहे.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आनंद भरोसे हे भाजपमधून आयात झालेले आहेत, आणि नुकतेच त्यांच्या भावाला भाजपने शहराध्यक्षपद दिले आहे. तरीही पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्षपद का दिलं याचे उत्तर हवे.”

Shiv Sena Workers Oppose Anand Bharose’s Appointment

व्यंकट शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक पातळीवरील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांना ही निवड मान्य नाही. त्यांनी मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर आपलं म्हणणं मांडण्याचा निर्धार व्यक्त केला असून, “पक्षाने निर्णय मागे घेतला नाही तर सर्व पदाधिकारी राजीनामे देतील,” अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भाजपने नुकतेच राज्यातील ५८ जिल्हाध्यक्ष जाहीर केले असून, महायुतीतील पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. त्यात परभणीत निर्माण झालेला हा वाद महायुतीच्या स्थानिक राजकारणात नवा पेच निर्माण करू शकतो.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही