🕒 1 min read
पुणे – भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्ध टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे अनेक समर्थक गोंधळले असून, काहींना दुःखही झालं असल्याचं मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी सांगितलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले केले होते. यानंतर दोन्ही देशांत ड्रोन हल्ले झाले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले होते, “युद्ध हा पर्याय नाही, अमेरिकेप्रमाणे दहशतवाद्यांना शोधून ठार करा. देशात कोम्बिंग ऑपरेशन करा, मॉकड्रील आणि एअर स्ट्राईकचा उपयोग नाही.”
Raj Thackeray’s Anti-War Stand Upsets Supporters
यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन म्हणाले, “राजसाहेब हे राष्ट्रवादी नेते आहेत. मात्र, अलीकडील युद्धाविरोधी भूमिकेमुळे समर्थक बुचकळ्यात पडले. काहींना यातून मानसिक दुःखही झालं.”
त्याचवेळी, प्रकाश महाजन यांनी एक मोठा राजकीय गौप्यस्फोट करत सांगितले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्यास संजय राऊत अडथळा आहेत. त्यांच्या विधानांमुळेच मनसे-शिवसेना युतीची शक्यता कमी होते.” महाजन पुढे म्हणाले, “आज जरी काही लोक राजसाहेबांचं हिंदुत्व नाकारत असले, तरी भविष्यात हेच हिंदुत्व लोक उचलून धरतील.”
📌 महत्वाच्या बातम्या
- डोनाल्ड ट्रम्पचा भारताला झटका, भारतात iPhone फॅक्टरी नको, अमेरिकेतच उत्पादन वाढवण्याचे आदेश
- हेड कॉन्स्टेबलना मिळाले गुन्ह्याच्या तपासाचे अधिकार; गृह विभागाचा मोठा निर्णय
- आईच्या इच्छेखातर अभिनेत्री झाले, पण लेखक म्हणूनच यश सापडलं! ट्विंकल खन्नाचा कबुलीजबाब













