🕒 1 min read
मुंबई – बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या ट्विंकल खन्नाने अलीकडेच एक मोठा खुलासा केला आहे. ट्विंकलने सांगितले की, अभिनय हा तिचा निवडलेला मार्ग नव्हता, तर तो तिला तिच्या आईच्या इच्छेमुळे स्वीकारावा लागला.
“इतर अनेक घरांप्रमाणे आमच्याही घरी पालकांच्या पायावर पाय ठेवून पुढे जायचं, असंच वातावरण होतं. जर कोणी मिठाई विकणारा असेल, तर मुलंही तशीच वाटचाल करतात. मी खरंतर सीए व्हायचं ठरवलं होतं. पण आईने मला सांगितलं, ‘अभिनेत्री होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे,’” असं ट्विंकलने सांगितलं.
I Became Actress Due to Mom’s Wish – Twinkle Khanna
ट्विंकलचं चित्रपटसृष्टीतील करिअर फार काळ चाललं नाही. तिचे अनेक चित्रपट अपयशी ठरले आणि अखेरीस तिने अभिनय क्षेत्र सोडून लेखन आणि निर्मितीकडे वळण्याचा निर्णय घेतला. याबाबत ट्विंकलने सांगितलं की, तिने तिच्या आईला टोमणा मारत विचारलं होतं – “तुला माहितीय का, तू मला जबरदस्ती केलीस?”
तिने पुढे सांगितलं, “आई म्हणाली – ‘आता तू काय करू शकतेस?’ आणि त्यावर मी म्हणाले – लेखक बनू शकते!” ट्विंकलच्या मते, पालकांनी आपल्या महत्त्वाकांक्षा मुलांवर लादू नयेत. त्याऐवजी त्यांच्या स्वभावानुसार त्यांना निर्णय घेऊ द्यावा.
📌 महत्वाच्या बातम्या
- ना गिल ना पंत! ‘या’ सर्वोत्कृष्ट खेळाडूकडे द्या कसोटी कर्णधारपद – सुनील गावसकरांचा सल्ला
- गंभीरचा ‘नो सुपरस्टार’ फॉर्म्युला; खेळाडूंना लावली शिस्त, तयार केले १० नवे नियम
- बात निकलेगी तो दूर तक जाएगी; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








