🕒 1 min read
पुण्यातून निर्मित झालेला मराठी लघुपट ‘सुलतान’ला फ्रान्समधील टूलूज इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2025 मध्ये मोठा सन्मान मिळाला आहे. लेखक-दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांच्या लघुपटाला ‘Audience Choice Award’ मिळाल्याने मराठी सिनेसृष्टीला जागतिक व्यासपीठावर गौरव मिळाला आहे.
‘सुलतान’ची कथा ग्रामीण भागातील जीवन, सामाजिक भेदभाव, आणि संघर्ष याभोवती फिरते. या लघुपटात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. त्याच्या मांडणीतील प्रामाणिकपणा आणि भावनिक संवादांमुळे प्रेक्षकांनी चित्रपटाला उचलून धरले.
Sultan Marathi Short Film Wins Audience Choice Award at Toulouse Indian Film Festival 2025
टूलूज फिल्म फेस्टिव्हलची यंदाची दहावी आवृत्ती होती, ज्यामध्ये विविध भारतीय भाषांतील निवडक चित्रपट सादर करण्यात आले. परंतु ‘सुलतान’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. परीक्षक म्हणून सारा जोगेट, रविंदर सिंग राणा आणि पंकज शर्मा यांची प्रमुख भूमिका होती.
हा महोत्सव व्हेनेसा बियांची यांच्या नेतृत्वाखाली सारा लेगुएव्हॅक्स आणि एलोडी हमिदोविक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. ‘सुलतान’च्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांच्या आगामी चित्रपट ‘Grazing Land’ ची उत्सुकता अधिक वाढली आहे. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शुबमन गिलचा पंचांशी वाद, रिव्ह्यूवरून गोंधळ; अभिषेक शर्मा म्हणाला शांत हो..!
- गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय, हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
- पंचांशी वाद, भावना व्यक्त करत शुबमन गिल म्हणतो, “कधी कधी भावना अनावर होतात”