Share

गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय, हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

GT vs SRH | GT beat SRH by 38 runs in IPL 2025 Match 51; Shubman Gill’s men inch closer to playoffs while Hyderabad face near elimination.

Published On: 

GT vs SRH IPL 2025: Gujarat Titans Beat Sunrisers by 38 Runs

IPL 2025 च्या 51 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर 38 धावांनी मात करत विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत गुजरातने 20 षटकांत 6 गडी गमावून 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटकांत 6 गडी गमावून 186 धावांपर्यंत मजल मारता आली.

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातसाठी हा यंदाच्या मोसमातील सातवा विजय ठरला असून, त्यांनी प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. याउलट, हैदराबादचा सातवा पराभव झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

GT vs SRH IPL 2025: Gujarat Titans Beat Sunrisers by 38 Runs

हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 74 धावा करत झुंज दिली. त्याने 6 षटकार आणि 4 चौकार लगावत उत्तम खेळी साकारली. मात्र, उर्वरित फलंदाज अपयशी ठरले. गुजरातकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी 2 बळी घेत निर्णायक भूमिका बजावली.

यापूर्वी, गुजरातच्या डावात शुबमन गिलने 76, जोस बटलरने 64 आणि साई सुदर्शनने 48 धावा करत भक्कम आधार दिला. त्यांना वॉशिंग्टन सुंदरने 21 धावांची साथ दिली. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने 3 विकेट्स घेत संघासाठी चमकदार कामगिरी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही