Share

पंचांशी वाद, भावना व्यक्त करत शुबमन गिल म्हणतो, “कधी कधी भावना अनावर होतात”

Shubman Gill reacts after a heated moment with umpires during GT vs SRH match in IPL 2025, says emotions can get intense during high-pressure games.

Published On: 

Gujarat Titans paying highest salary to Rashid Khan not Shubman Gill

🕒 1 min read

IPL 2025 मधील गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात विजय मिळवूनही कर्णधार शुबमन गिल चर्चेचा विषय ठरला. सामन्यादरम्यान एका रनआउटच्या निर्णयावरून त्याचा पंचांशी वाद झाला होता. तसेच हैदराबादच्या डावात अभिषेक शर्माही एलबीडब्ल्यू रिव्ह्यूवर नाराज दिसला.

सामना संपल्यानंतर गिलने स्पष्ट केलं की, “माझी थोडीशी चर्चा झाली, कारण कधी कधी भावना अधिक तीव्र असतात. आपण मैदानात 110 टक्के देतो, त्यामुळे असं घडणं स्वाभाविक आहे.”

Shubman Gill Reacts to Umpire Dispute in IPL 2025

गुजरातने या सामन्यात 224 धावा केल्या आणि हैदराबादला 186 धावांवर रोखत 38 धावांनी विजय मिळवला. गिलने संघाच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. त्याने सांगितलं, “काळ्या मातीच्या खेळपट्टीवर षटकार मारणे सोपे नाही, पण आमचं नियोजन आणि धावांसाठी असलेली भूक आम्हाला पुढे नेत आहे.”

या विजयामुळे गुजरात टायटन्सचे प्लेऑफकडे एक पाऊल जवळ गेले आहे, तर हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
IPL 2025 Cricket India Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या