Share

Sanjay Dutt | ‘तिच्या आई-वडिलांमुळे आमचा संसार मोडला…’, घटस्फोटावर संजय दत्तचं मोठं वक्तव्य

In a candid interview, Sanjay Dutt revealed that his first marriage with Richa Sharma ended due to constant interference and accusations from her family members.

Published On: 

‘Our life broke because of her parents…’, Sanjay Dutt's big statement on divorce

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक चढ-उतारांवर उघडपणे भाष्य केलं आहे. विशेषतः त्याच्या पहिल्या पत्नी ऋचा शर्मा यांच्याशी झालेल्या घटस्फोटाबाबत त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

संजय दत्त आणि अभिनेत्री ऋचा शर्मा यांचा विवाह 1987 साली झाला होता. त्यांना एक मुलगी झाली होती. पण काही काळानंतर ऋचा शर्मा हिला ब्रेन ट्युमर झाल्याचं निदान झालं. या आजारानंतर दोघांमध्ये अंतर वाढू लागलं आणि अखेर त्यांचा घटस्फोट झाला.

‘Our life broke because of her parents…’, Sanjay Dutt big statement on divorce

यावर अनेकांनी संजय दत्तवर टीका केली की, आजारी पत्नीला त्याने सोडून दिलं. मात्र संजय दत्तने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. एका मुलाखतीत तो म्हणाला, मी असा पुरुष नाही की, कठीण काळात पत्नीची  साथ सोडेल. मी ऋचाला जितकं धैर्य दिलं, तितकं कोणालाही शक्य झालं नसतं.”

संजयने पुढे स्पष्ट केलं की, आमच्या नात्याचा शेवट झाला, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच वाईट नाही. मात्र तिचे आई-वडील आमच्या नात्यात वारंवार हस्तक्षेप करत होते. त्यांनी माझ्यावर अनेक गंभीर आरोप केले, ज्यामुळे आमचं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालं.”

इतकंच नव्हे, तर ऋचाच्या बहिणीने देखील त्यांच्या नात्यात हस्तक्षेप केल्याचा आरोप संजय दत्तने केला. नवरा-बायकोमधलं नातं हे त्यांचं खासगी असतं, त्यात तिसऱ्यांनी बोलू नये,” असं म्हणत त्याने आपली बाजू मांडली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही