Share

मोठी बातमी : 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गदारोळ

20 दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना प्रकृती खालावल्याने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतरमंतरवर तणाव निर्माण झाला.

Published On: 

Sonam Wangchuk

दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतरवरून (JantarMantar) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या २० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना रुग्णालयात नेल्यामुळे घटनास्थळी मोठा गदारोळ झाला आणि तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईनंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.

सोनम वांगचुक जंतरमंतरवर २० दिवसांपासून उपोषण करत होते. ‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या (Paper Leak) पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroch Janta Party) बॅनरखाली हे आंदोलन सुरू केले होते. या दीर्घ उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन २० किलोंनी घटले आणि त्यांच्या स्नायूंच्या आरोग्यावरही परिणाम झाला.

शुक्रवारी रात्री शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये वांगचुक यांनी २० जुलै रोजी ‘चलो संसद’ (Chalo Sansad) आंदोलनाची हाक दिली होती. व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “जर देशातील कांद्याच्या दरांसाठी सरकारला जबाबदार धरले जाते, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवस्थापनासाठीही त्यांना जबाबदार धरलेच पाहिजे. नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या मुद्द्यांसाठी सरकारने उत्तर दिलेच पाहिजे.”

वांगचुक यांच्या उपोषणानंतर अनेक संघटनांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला असून, नीट पेपर फुटीबाबत सरकारने उत्तरे द्यावीत आणि राजकीय कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही