Sanjay Dutt | अभिनेता संजय दत्त, पत्नी मान्यता दत्त आणि जुळ्या मुलांसोबत सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत. परंतु त्यांच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा संजय वादग्रस्त प्रकरणांमध्ये गुंतला होता. आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला तुरुंगात जावे लागले होते. त्यावेळी त्याची तिसरी पत्नी मान्यता गर्भवती होती. अशा कठीण परिस्थितीत, संजय दत्त यांनी मान्यताची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्या जवळच्या मैत्रीण शीबा आकाशदीप यांच्यावर सोपवली होती.
शीबा आकाशदीप यांनी एका मुलाखतीत सांगितले, “संजय आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. जेव्हा संजय तुरुंगात होते, तेव्हा मी मान्यतासोबत तिच्या गर्भावस्थेचे नऊ महिने होते. संजयने मला फोन करून सांगितले की मान्यता एकटी आहे आणि तिची काळजी घेण्यासाठी मी तिच्याकडे जावे. मी रोज तिच्या घरी जाऊन तिची काळजी घेत असे.”
तुरुंगातील अनुभवांबद्दल बोलताना संजय दत्त यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, “जेव्हा मी पहिल्यांदा तुरुंगात गेलो, तेव्हा सुनील शेट्टी, अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान मला भेटायला आले होते. त्यांनी मला दिलासा दिला. पण तुरुंगात राहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला त्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले. मी तुरुंगात कुकिंग शिकलो, वर्कआउट केले आणि शिक्षा संपल्यानंतर नवीन उत्साहाने जीवनाला सुरुवात केली.”
Sheeba Akashdeep On Sanjay Dutt
आज संजय दत्त ६५ वर्षांचे असूनही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. संजय लवकरच ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या