Dhananjay Deshmukh । बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीही त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही. यामुळे बीड जिल्ह्याचे वातावरण चांगलेच पेटले आहे.
संतोष देशमुखांना न्याय मिळावा या मागणीसाठी उद्या मस्साजोगचे नागरिक अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख देखील सहभागी होणार आहेत. अशातच आता मस्सजोगमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
वारकरी संप्रदायातून भागचंद महाराज झांजे (Bhagchand Maharaj Zanje), शांतीवन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक नागरगोजे (Deepak Nagargoje) यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. ते देखील उद्यापासून मस्साजोगमध्ये सुरु होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
एकीकडे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी मस्साजोगमध्ये उद्या आंदोलन केले जाणार आहे, तर दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) देखील आंदोलन करणार आहेत.
Bhagchand Maharaj, Deepak Nagargoje meet Dhananjay Deshmukh
यामुळे राज्य सरकारची कोंडी होऊ शकते. याप्रकरणी आता सरकार कोणते निर्णय घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरते. जर आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :