🕒 1 min read
बीड | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या ( Santosh Deshmukh murder ) प्रकरणात आज (19 मे) बीड येथील विशेष न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या खटल्यातील आरोपींवर आज चार्जफ्रेम केली जावी, अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज न्यायालयात उपस्थित होते.
धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले की, “चार्जफ्रेम झाली पाहिजे, आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे. मागील वेळेस कोर्टाच्या रजेमुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता न्याय मिळणे गरजेचे आहे.”
Santosh Deshmukh Murder Case Hearing Today in Beed Court
या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या खटल्यातील काही आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी विष्णू चाटेने यापूर्वी निर्दोष मुक्तीचा दावा करणारा अर्ज दिला होता, परंतु आज त्याच्या वकिलाने तो अर्ज मागे घेतला.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आजच्या सुनावणीला अनुपस्थित होते. न्यायालयात सरकारी वकील युक्तीवाद करतील आणि मागील सुनावणीत दाखल केलेल्या डिस्चार्ज एप्लीकेशन्सवर निर्णय घेण्यात येणार आहे.
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणावरूनही आपली प्रतिक्रिया नोंदवली. “मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील या संदर्भात निर्णय घेतील. आरोपींना अभय दिले जात आहे, हे खपवून घेता येणार नाही. जेलच्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी व्हायला हवी,” असे त्यांनी सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात सरन्यायाधीशांचा अपमान? गवईंच्या नाराजीनंतर अधिकाऱ्यांकडून उशिरा दिलगिरी
- “शिष्टमंडळावरून राजकारण नको” – शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
- दहशतवाद्यांचा ठावठिकाणा नाही, तरी विजय जल्लोष का? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना थेट सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now