Share

डोळ्यात मिरची पूड, कोयत्याचे सपासप वार…; मनसे नेत्याचा थरारक खून, भाजपच्या ‘बिनविरोध’ पॅटर्नवर रक्ताचा डाग?

MNS student wing chief Balasaheb Sarvade murdered in Solapur over election dispute; BJP candidate Shalan Shinde and 14 others booked for the crime.

Published On: 

MNS student wing chief Balasaheb Sarvade murdered in Solapur over election dispute; BJP candidate Shalan Shinde and 14 others booked for the crime.

सोलापुर – सत्तेसाठी आणि निवडणुकीत जिंकण्यासाठी माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा एक संतापजनक आणि थरारक प्रकार सोलापुरात घडला आहे. सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख बाळासाहेब सरवदे (Balasaheb Sarvade) यांची भररस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येचा संबंध भाजपच्या ‘बिनविरोध’ निवडणुकीच्या प्रयत्नांशी जोडला जात असल्याने प्रकरण चांगलंच तापलं आहे.

MNS Balasaheb Sarvade murdered in Solapur

नेमकं काय घडलं?

सोलापूरच्या प्रभाग क्रमांक दोन ‘क’ मध्ये भाजपने शालन शिंदे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात रेखा सरवदे यांनी अपक्ष अर्ज भरला होता, पण नंतर त्यांनी तो मागे घेतला. अर्ज मागे घेताच भाजपच्या समर्थकांनी रेखा सरवदे यांच्या घरासमोर जल्लोष सुरू केला. आपल्या घरासमोर हा धिंगाणा का? हे विचारण्यासाठी बाळासाहेब सरवदे (Balasaheb Sarvade) गेले.

जाब विचारायला गेलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली आणि त्यानंतर कोयता, चाकू आणि गुप्तीने सपासप वार करण्यात आले. हा हल्ला इतका भयानक होता की सरवदे (Balasaheb Sarvade) यांचा जागीच मृत्यू झाला.

ज्या ‘बिनविरोध’ निवडणुकीसाठी हा सगळा खटाटोप झाला, त्या भाजप उमेदवार शालन शिंदे यांच्यासह तब्बल १५ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात विद्यमान नगरसेविकांचाही समावेश आहे. विरोधकांनी या हत्येमागे भाजपच्या दडपशाहीचा आणि ‘बिनविरोध पॅटर्न’चा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोलापुरात या घटनेनंतर तणावाचे वातावरण असून, पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही