Share

भिवंडीत राडा! भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले; ‘त्या’ हत्येच्या आठवणीने वातावरण तापलं, महिलांवर दगडफेक?

Violent clash erupts between BJP and Congress workers in Bhiwandi’s Ward 20. Stone pelting reported; police resort to lathi-charge to control the situation.

Published On: 

Bhiwandi Election Clash: भिवंडीत भाजप-काँग्रेसमध्ये तुफान हाणामारी!

🕒 1 min read

मुंबई – निवडणुकीच्या रणधुमाळीत शब्दांचे वार चालतात, हे आपल्याला माहितीये. पण जेव्हा शब्दांची जागा दगड आणि लाठ्या घेतात, तेव्हा काय होतं? याचा थरारक अनुभव भिवंडीकरांनी शनिवारी संध्याकाळी घेतला. भिवंडी महापालिकेच्या (Bhiwandi Election) प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठले. नारपोलीच्या भंडारी चौकात झालेला हा राडा इतका भयंकर होता की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

झालं असं की, भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांची कार्यालयं या भागात जवळजवळ आहेत. काँग्रेसची एक प्रचार रॅली भाजप कार्यालयाच्या बाजूच्या गल्लीतून जात होती. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीवरून ठिणगी पडली आणि बघता बघता शाब्दिक बाचाबाचीचं रूपांतर तुफान हाणामारीत झालं. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्लास्टिकच्या खुर्च्या, लाठ्या आणि दगड भिरकावण्यात आले. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.

भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी दावा केलाय की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक भाजप कार्यालयासमोर येऊन घोषणाबाजी केली आणि पोलिसांच्या देखत दगडफेक केली. काँग्रेसच्या बाजूने दिवंगत नेते मनोज म्हात्रे यांची मुलगी हर्षाली म्हात्रे हिने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. “आम्ही घरोघरी प्रचार करत असताना भाजपवाल्यांनी आम्हाला अडवलं आणि महिलांवर दगडफेक केली. २०१७ मध्ये माझ्या वडिलांची हत्या केली होती, आता उमेदवार असलेल्या माझ्या आईवर हल्ला चढवला,” असा संताप हर्षालीने व्यक्त केला.

सध्या नारपोली आणि भोईवाडा पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या राड्यामुळे भिवंडीतलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही