🕒 1 min read
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या भूमिकेचे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पष्टीकरण देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात जाणार आहे. मात्र, या शिष्टमंडळावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यांनी या दौऱ्यावर ‘राजकीय अजेंडा’ असल्याचा आरोप केला.
संजय राऊत म्हणाले होते की, “आमच्या पक्षाचे लोकसभेत 9 खासदार आहेत. मात्र सरकारने आमच्याकडून कोणतीही विचारणा केली नाही. ही सरकारची पक्षपाती भूमिका असून सरकारी खर्चावर हे शिष्टमंडळ फिरवले जात आहे.” त्यांनी असा सवाल केला की, परदेशात भारताचे उच्चायुक्त आहेतच, मग हे खासदार जाऊन नेमकं काय करणार?
Sharad Pawar Responds to Sanjay Raut’s Criticism
या टीकेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संजय राऊत यांना अप्रत्यक्ष टोला लगावत सांगितले की, “आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर स्थानिक राजकारण आणू नये. शिष्टमंडळे ही पक्षीय अजेंड्यावर नसतात. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात मीही शिष्टमंडळाचा भाग होतो. अशावेळी सर्व पक्षांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या भूमिकेतून विचार करायला हवा.”
पवार यांनी स्पष्ट केलं की, सरकारने हे शिष्टमंडळ देशाची भूमिका मांडण्यासाठी नेमले आहे, आणि कोणाचं वैयक्तिक मत काय आहे, यावर त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. “स्थानिक राजकारण अशा वेळी देशाच्या हिताला मारक ठरू शकते,” असे मत शरद पवार यांनी मांडले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दहशतवाद्यांचा ठावठिकाणा नाही, तरी विजय जल्लोष का? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना थेट सवाल
- सुनील शेट्टींचं सी-सेक्शनबाबतचं वक्तव्य वादात; सोशल मीडियावर झाले ट्रोल
- “कसाबचं भूत आणि अंधश्रद्धा तुरुंगात जिवंत”; संजय राऊतांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकातील किस्से













