🕒 1 min read
मुंबई – ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक प्रकाशित करत तुरुंगातील अनुभव, राजकीय नाट्य, आणि पडद्यामागील वास्तव उघड केले आहे. या पुस्तकातील अनेक प्रकरणे आता चर्चेचा विषय ठरत आहेत.
राऊत यांनी तुरुंगातील अंधश्रद्धेवर आणि प्रचलित अफवांवरही प्रकाश टाकला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आर्थर रोड तुरुंगात अजमल कसाबचं भूत असल्याची चर्चा होती. तुरुंगात राहणारे काही लोक कसाबच्या कोठडीत भूत फिरत असल्याचं सांगत. विशेष म्हणजे, राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्याच कोठडीत ठेवण्यात आलं होतं.
Sanjay Raut Reveals Kasab’s Ghost jail Story
राऊत म्हणतात, “कसाबचं भूत शोधण्यासाठी मी अनेक रात्री जागून काढल्या, पण ते काहीच दिसलं नाही. प्रकाशमान यार्डात भुते फिरत नाहीत. सरकारला आम्हीच भुते वाटत होतो बहुतेक!”
पुस्तकात कसाबच्या कोठडीचंही तपशीलवार वर्णन देण्यात आलं आहे – ती अत्यंत सुरक्षायुक्त, बुलेटप्रुफ, आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी भरलेली होती. आजही त्या खोलीत कसाबचे कपडे, बॅग आणि AK-47 बंदूक आहे, असं राऊत यांनी लिहिलं आहे.
यामध्ये तुरुंगातील अंधश्रद्धेवर लेखक-पत्रकार रुपेश कुमार सिंह यांच्यासोबतचा संवादही नमूद आहे. तुरुंगात भुते पळवण्यासाठी पूजा-पाठ केल्या जातात, पण कैद्यांना पुस्तक वाचण्याचा अधिकार दिला जात नाही, अशी टीका त्यातून झाली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मिथुन चक्रवर्तींच्या घरावर टांगती तलवार; BMC कडून नोटीस
- “मी दोषी नव्हतो तरी अडीच वर्षे तुरुंगात होतो”; भुजबळांचा PMLA कायद्याच्या अन्यायावर आक्रोश
- अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या; हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांचा गळफास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








