🕒 1 min read
पुणे: मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) सध्या देशात चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या कायद्यावर मौन सोडले असून त्याचा प्रत्यक्ष फटका आपल्याला कसा बसला, हे सांगत काँग्रेस सरकारच्या काळात कायद्यात झालेल्या बदलांवर जोरदार टीका केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “2013 मध्ये चिदंबरम यांनी कायद्यात E प्रकाराची सुधारणा केली आणि त्यामुळे A आणि B कायद्याचे एकत्रीकरण झाले. यामुळे जामीन मिळणे अशक्य झाले. मी दोषी नसतानाही अडीच वर्षे तुरुंगात होतो. कायद्यातील याच तरतुदीचा मी पहिला बळी ठरलो.”
Chhagan Bhujbal on PMLA Law
ते पुढे म्हणाले, “चिदंबरम यांनी कायद्यात बदल करताना ऐकले नाही. अरुण जेटली, शरद पवार यांनी विरोध केला होता. पण त्यांनी (चिदंबरम) हे पाप केलं. त्याच कायद्याचा फटका नंतर चिदंबरम आणि त्यांच्या मुलालाही बसला.”
छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर आणि तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली. “तुम्ही कायदे करताय पण त्याचा उपयोग होतो की दुरुपयोग याचा विचार करता का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या; हुंड्याच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे यांचा गळफास
- IPL 2025: LSG vs SRH मधील शेवटची लढत आज लखनऊच्या मैदानात
- भारतासाठी सर्वस्व दिलं, आता विराट कोहलीला भारतरत्न द्या!; माजी क्रिकेटपटूचं वक्तव्य चर्चेत