🕒 1 min read
नवी दिल्ली – भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने स्टार फलंदाज विराट कोहली याला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. कोहलीने नुकताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने १२३ सामन्यांत ९२३० धावा केल्या आहेत.
रैना म्हणाला की, “मला वाटतं, भारत सरकारने त्याला भारतरत्न द्यावा. त्याने देशासाठी खूप काही मिळवलं आहे,” असं सुरेश रैनाने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटलं.
Suresh Raina Urges Bharat Ratna for Virat Kohli
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून त्याने ६८ कसोटीत कप्तानी करताना ४० विजय मिळवले. केवळ कसोटीतच नव्हे तर वनडेमध्येही कोहलीचं योगदान मोठे राहिलं असून त्याने आतापर्यंत १४,००० हून अधिक धावा केल्या आहेत. कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम त्याच्या नावावर केला असून त्याने ५१ शतके ठोकली आहेत, तर सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ शतके आहेत. सध्या भारतरत्न मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू म्हणजे सचिन तेंडुलकर, ज्याला २०१४ मध्ये निवृत्तीनंतर हा सन्मान देण्यात आला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- राजस्थान विरुद्ध पंजाब आज जयपूरमध्ये थरारक सामना, PBKS साठी ‘करो या मरो’ची परिस्थिती!
- “…म्हणून राऊतांना अटक झाली”, शरद पवारांचा ईडी कारवाईवर गंभीर आरोप
- ऑपरेशन सिंदूरवरून विदेश मंत्री जयशंकर अडचणीत; काँग्रेसची राजीनाम्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now