🕒 1 min read
मुंबई – ‘नरकातला स्वर्ग’ या संजय राऊत लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. राऊतांच्या स्पष्ट आणि परखड लिखाणामुळेच त्यांच्यावर ईडीमार्फत कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
“पत्राचाळ प्रकरण फक्त एक निमित्त होतं. संजय राऊत सामनामधून नेहमी रोखठोक भूमिका मांडतात. हीच लेखणी काहींना पटली नाही. त्यामुळे संधीच्या शोधात असलेल्यांनी पत्राचाळ प्रकरणातून त्यांना लक्ष्य केलं,” असं पवार म्हणाले.
Sanjay Raut Arrested Due to Bold Writing said Sharad Pawar
पवारांनी आणखी उदाहरणं देत म्हटलं, “एकनाथ खडसेंचे जावई इंग्लंडहून आले आणि त्यांनाही तातडीने अटक झाली. अनिल देशमुखांवरही 100 कोटींचा आरोप झाला, पण खटला शेवटी एका कोटीवर आला. पण या साऱ्यांनी हार मानली नाही. एकमेकांना आधार दिला.”
त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत म्हटलं की, “हे पुस्तक वाचल्याशिवायच सत्ताधारी टीका करत आहेत. पण प्रत्यक्षात हे पुस्तक सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं ज्वलंत उदाहरण आहे. निवडणुका येतात-जातात, पण लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास कायम राहायला हवा.”
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑपरेशन सिंदूरवरून विदेश मंत्री जयशंकर अडचणीत; काँग्रेसची राजीनाम्याची मागणी
- अमित शाह आम्हाला दुश्मन का समजतात?; उद्धव ठाकरे यांचा थेट सवाल
- IPL 2025 – बंगळुरु-कोलकाता आयपीएल सामना पावसामुळे रद्द