🕒 1 min read
मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्ला चढवला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “जर कोणी विचारले की अमित शाह आमच्या घरी आले होते का, त्यांनी बाळासाहेबांकडे मदत मागितली होती का, तर मी म्हणेन मला आठवत नाही. उपकार मोजायचे नसतात, ते करायचे असतात.”
Uddhav Thackeray criticized Amit Shah and BJP
उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. “आम्ही विरोधी म्हणजे देशद्रोही नाही. आमचं हिंदुत्व हे देशासाठी आहे, तरी तुम्ही आम्हाला दुश्मनासारखं पाहताय. तुम्हाला वाटत असेल की पाकिस्तानच्या आधी आम्हाला खतम करा, मग करा…! पण शिवसेना संपणार नाही.”
इतकंच नव्हे तर ठाकरे यांनी जुनी आठवण सांगताना म्हटलं, “1995 मध्ये रजनी पटेल म्हणाले होते शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा, नाहीतर तुरुंगात टाकू. तेव्हा बाळासाहेबांनी सांगितलं होतं – तुरुंगात टाकाल, तर तुमची अंत्ययात्रा बाहेर निघेल.
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “काही माणसं कायमची सोबत राहतात, काही संधीसाधू असतात. शिवसेनाप्रमुख आपली परीक्षा घेत आहेत,” असं सांगत त्यांनी पक्षनिष्ठेचा संदर्भ दिला.
“100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा, एक दिवस वाघासारखं जगा,” या बाळासाहेबांच्या शब्दांची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना ही मराठी माणसांचे हित जपणारी ताकद आहे, आणि म्हणूनच तिला संपवण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. प्रकाशित होणारं पुस्तक हे संजय राऊत यांचं तुरुंगातील अनुभव, राजकीय संघर्ष, आणि आतल्या गुप्त घटनांचा पर्दाफाश करतं.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025 – बंगळुरु-कोलकाता आयपीएल सामना पावसामुळे रद्द
- सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही – जावेद अख्तर
- हे सरकार उद्या जाणारच! उद्धव ठाकरे यांचा मोदी-फडणवीसांवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now