Share

IPL 2025 – बंगळुरु-कोलकाता आयपीएल सामना पावसामुळे रद्द

The 58th IPL 2025 match between RCB and KKR at Bengaluru’s Chinnaswamy Stadium was washed out due to heavy rain.

Published On: 

The 58th IPL 2025 match between RCB vs KKR at Bengaluru's Chinnaswamy Stadium was washed out due to heavy rain. Fans waited in hope, but rain had the final say.

🕒 1 min read

बंगळुरु | आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 58 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज संध्याकाळी पार पडणार होता. मात्र जोरदार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. सामना बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता.

संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार होती आणि 7 वाजता टॉस होणार होता. पण त्या आधीच पावसाने हजेरी लावली. स्टेडियम परिसरात दीर्घकाळ मुसळधार पाऊस झाल्यामुळे मैदान खेळण्यासाठी अनुकूल राहिलं नाही. काही वेळ पाऊस थांबल्यानंतर ग्राउंड स्टाफने खेळपट्टी कोरडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसाने पुन्हा हजेरी लावली.

RCB vs KKR IPL 2025 Match Abandoned Due to Rain

पंचांनी परिस्थितीचा आढावा घेतला, पण शेवटी खेळ शक्य नसल्याचं मान्य करत सामना रद्द करण्यात आला. आयपीएलने सोशल मीडियावरून याची अधिकृत घोषणा केली. हा सामना टॉस न होताच रद्द झाला. आयपीएल 2025 मध्ये रद्द झालेला हा तिसरा सामना ठरला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!