Share

पहिल्याच कसोटीत फटकेबाजी! यशस्वी जैस्वालने इंग्लंडमध्ये केला इतिहास

Yashasvi Jaiswal hits fifty on Test debut in England, sets rare overseas record.

Published On: 

Yashasvi Jaiswal hits fifty on Test debut in England, sets rare overseas record.

🕒 1 min read

प्रतिनिधी – भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने पुन्हा एकदा परदेशी खेळपट्टीवर आपली ताकद सिद्ध केली आहे. इंग्लंड दौऱ्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत एक विशेष विक्रम आपल्या नावावर केला.

जैस्वालने आता तीन वेगवेगळ्या देशांतील कसोटी पदार्पण सामन्यात ५० हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे South Africa, England, New Zealand, Australia देशांतील कठीण वातावरणातही तो संयमी फलंदाज म्हणून उभा राहिल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

Yashasvi Jaiswal scores 50+ on debut in three nations

इंग्लंडच्या खेळपट्टीवर खेळताना जैस्वालने संयम दाखवत अर्धशतक पूर्ण केलं. पहिल्या डावात त्याची खेळी भारतासाठी महत्त्वाची ठरली. ऑस्ट्रेलियन खेळपट्टीवरही त्याने अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिलं होतं.

जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) पहिल्याच सामन्यात १७१ धावांची मोठी खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत मात्र त्याला अपेक्षित यश मिळालं नाही. पहिल्या डावात केवळ १७ आणि दुसऱ्या डावात ५ धावांवर तो बाद झाला होता.

मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यावर दुसऱ्या डावात त्याने १६१ धावांची जबरदस्त खेळी करत तगडं पुनरागमन केलं. आता इंग्लंडमध्येही त्याने अर्धशतक झळकावले आहे. जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांकडून जैस्वालच्या ( Yashasvi Jaiswal ) खेळीचं कौतुक केलं जात असून, परदेशी दौऱ्यांमध्ये त्याचा हा फॉर्म भारतासाठी मोठी आशा ठरत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

India Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now