Yashasvi Jaiswal : बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border- Gavaskar Trophy) झालेल्या दारुण पराभवानंतर बीसीसीआय (BCCI) कसोटी संघाचा कर्णधार बदलणार असल्याची चर्चा जोराने सुरु आहे. त्यामुळे रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) कसोटीमध्ये कर्णधार कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
या अपडेटनुसार, युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा नवीन कर्णधार होऊ शकतो. माहितीनुसार, शनिवारी मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत भावी कर्णधारावर चर्चा झाली होती आणि या बैठकीत रोहित म्हणाला होता की, मी काही महिने खेळेन, तोपर्यंत तुम्ही भावी कर्णधार निवडावा. बुमराह हा भारताचा कसोटी कर्णधार होण्यासाठी आघाडीवर आहे पण त्याच्या तंदुरुस्तीच्या चिंतांमुळे तो दीर्घकालीन पर्याय वाटत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात कर्णधारपद बुमराहकडे होते मात्र दुखापतीमुळे तो पूर्ण पाचवा सामना खेळू शकला नाही.
रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल असे मानले जाते. भारतीय संघाला जून-जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर पुढील कसोटी मालिका खेळायची आहे. रोहित पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडला जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत, 31 वर्षीय बुमराह हेडिंग्ले येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करेल.
203 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 443 विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बुमराह ऑस्ट्रेलियामध्ये 32 विकेट्स घेत ‘प्लेअर ऑफ द सीरिज’ बनला. परदेशी भूमीवर कोणत्याही भारतीयाने घेतलेले हे सर्वाधिक विकेट आहेत. आढावा बैठकीत एका मजबूत उपकर्णधाराची गरज यावरही चर्चा झाली कारण 30 वर्षांचा बुमराह कसोटी व्यतिरिक्त एकदिवसीय आणि टी-20 मध्ये उपयुक्त आहे. निवडकर्त्यांना पंतला कसोटी संघाचा कर्णधार बनवायचे आहे, परंतु प्रशिक्षक गंभीर यशस्वी जयस्वालला पसंती देऊ शकतात.
Indian team for Champions Trophy
तर दुसरीकडे 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबई येथे होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताने अद्यापसंघाची घोषणा केलेली नाही. शनिवारी मुंबईत भारतीय निवडकर्त्यांसोबत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या बैठकीत इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड जवळजवळ झाली आहे, परंतु वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्याबद्दल काही अपडेट न आल्याने संघाची घोषणा करण्यात आलेली नाही.
महत्वाच्या बातम्या :