🕒 1 min read
Pandit Vishnu Rajoria : आपल्या देशात राजकीय मंडळी कधी काय करणार याचा कोणालाच नेम राहिलेला नाही. एकीकडे केंद्र सरकार (Central Government) राज्य सरकारसोबत मिळून लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध कार्यक्रम राबवत आहेत. तसेच याबाबत लोकांना जागरूक करत आहे.
तर दुसरीकडे आता मध्य प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असलेल्या मंडळाच्या अध्यक्षांनी लोकसंख्या वाढीसाठी पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशातील परशुराम कल्याण मंडळाचे (Parashuram Kalyan Mandal) अध्यक्ष पंडित विष्णू राजोरिया (Pandit Vishnu Rajoria) यांनी एक आवाहन केले आहे. चार मुले जन्माला घालण्याचा निर्णय घेणाऱ्या तरुण ब्राह्मण जोडप्यांना त्यांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. राजोरिया यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे.
भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना राजोरिया म्हणाले की, देशात बिगर हिंदूंची संख्या वाढत आहे कारण आपण आपल्या कुटुंबांचा विस्तार करण्याकडे लक्ष देणे मोठ्या प्रमाणात थांबवले आहे. तरुणांकडून खूप अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मोठ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करू शकत नाही.
राजोरिया म्हणाले की, भावी पिढीच्या सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. आजचे तरुण स्थायिक होतात आणि एका मुलाच्या जन्मानंतर त्यांचे कुटुंब वाढवणे थांबवतात. हे खूप चिंताजनक आहे.
Pandit Vishnu Rajoria Announcement
पुढे बोलताना राजोरिया म्हणाले, “मी आग्रह धरतो की तुम्हाला किमान चार मुले असली पाहिजेत.” त्यानंतर त्यांनी घोषणा केली की परशुराम बोर्ड चार मुले असलेल्या जोडप्यांना 1 लाख रुपये देईल. ते म्हणाले की जरी मी मंडळाचे अध्यक्ष नसलो तरी तुम्हाला पुरस्कार दिला जाईल.
राजोरिया म्हणाले की, तरुणाई त्यांना अनेकदा सांगते की शिक्षण आता खूप महाग झाले आहे. याबद्दल ते म्हणाले की, तुम्ही कोणत्याही प्रकारे जगू शकता, पण मुले जन्माला घालण्यात मागे राहू नका. जर तुम्ही हे केले नाही तर दुसरे लोक या देशावर कब्जा करतील.
महत्वाच्या बातम्या :
- Mahakumbh 2025 : कोण आहेत नागा साधू? शाही स्नानापूर्वी करतात ‘हे’ 17 अलंकार, जाणून घ्या सर्वकाही…
- Mercedes Electric G Class Launched : दमदार फीचर्स अन् 473 किमी रेंजसह बाजारात आली मर्सिडीज इलेक्ट्रिक जी क्लास, किंमत फक्त…
- Mahindra XUV 3XO EV ‘या’ दिवशी होणार लाँच, क्लास फीचर्ससह Punch EV ला देणार टक्कर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










