Share

Mercedes Electric G Class Launched : दमदार फीचर्स अन् 473 किमी रेंजसह बाजारात आली मर्सिडीज इलेक्ट्रिक जी क्लास, किंमत फक्त…

by Aman
Mercedes Electric G Class Launched with powerful features and 473 km range

Mercedes Electric G Class Launched : जागतिक बाजारात आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कार्सची (Electric Cars) मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच आज अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार रेंज आणि पावरफुल बॅटरी पावरसह नवीन नवीन कार्स लाँच करत आहे. अशीच एक इलेक्ट्रिक कार आता मर्सिडीज-बेंझने (Mercedes-Benz) लाँच केली आहे.

बाजारात कंपनीने इलेक्ट्रिक जी-क्लास (Mercedes Electric G Class) या नावाने आपली नवीन कार लाँच केली आहे. माहितीनुसार, या कारची एक्स शोरुम किंमत जवळपास 3 कोटी रुपये आहे. सध्या या कंपनीकडून या कारची बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्येही ही कार प्रदर्शित करण्यात येणार आहे.

कंपनीने या कारमध्ये भन्नाट फीचर्ससह डॅशिंग लूक आणि पावरफुल बॅटरी देखील दिली आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये EQS प्रमाणेच बॅटरी सेटअप दिला आहे. कंपनीने या एसयूव्हीमध्ये 116 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार एका चार्जवर 473 किमीची रेंज देते. तसेच या कारची बॅटरी फक्त 32 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. असा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे.

माहितीनुसार, एसयूव्हीची केबिन जी-क्लाससारखीच आहे पण ही कार एक इलेक्ट्रिक एसयूव्ही असल्याने काही बदल करण्यात आले आहे. तसेच या कारमध्ये मर्सिडीज बेंझची MBUX मल्टीमीडिया सिस्टम देण्यात आली आहे. यात 12.3 इंचाचा ड्युअल स्क्रीन समाविष्ट आहे. हे ड्रायव्हर डिस्प्ले आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट म्हणून काम करणार आहे. तर हीटिंग, व्हेंटिलेशन आणि एसी कंट्रोल बटणे टचस्क्रीनच्या खाली देण्यात आली आहे. याच बरोबर कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फक्त 4.7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग प्राप्त करू शकते.

Mercedes Electric G Class Update

तर या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा कमाल वेग ताशी 180  किलोमीटर आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 587 एचपी पॉवर आणि 1164 एनएम टॉर्क जनरेट करते. बाजारात जी-क्लास तिच्या शक्तिशाली ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.त्यामुळे कंपनीने या कारचे फ्रंट सस्पेंशन पूर्वीसारखेच ठेवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Mercedes Electric G Class Launched: The demand for large-scale electric cars is now increasing rapidly in the global market.

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now
by Aman

संबंधित बातम्या