Suresh Dhas । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच बीडमध्ये परळी तालुक्यातील अजून एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला आहे. संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) हत्याप्रकरण ताजे असतानाच आता हा अपघात झाल्याने याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.
परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला होता. याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर ( Abhimanyu Kshirsagar ) यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी सुरेश धस यांनी संशय व्यक्त केला आहे. हा अपघात आहे कि घातपात?, असा सवाल त्यांनी केलाय. ते म्हणाले, सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे. संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही अवैध राखेची वाहतूक करणारे टिप्पर बंद झाले नाहीत. याला परळी पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार असल्याचं धस म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :