Share

“मी दोन सांभाळतोय, माझा दम काढू नका”, Suresh Dhas पुन्हा बरळले

by MHD
Dharashiv Morcha Suresh Dhas Statement

Suresh Dhas । संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक केली आहे. हाच वाल्मिक कराड अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे ते सतत मुंडे यांचा राजीनामा मागत आहेत.

अशातच आता सुरेश धस हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आज धाराशिव येथे सर्वपक्षिय आक्रोश मोर्चा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “८९० कोटी रुपयांच्या ड्रग्जमध्ये कैलास सानप आणि आंधळेचं नाव आहे. हे लोक मला धमक्या देतात, या असल्या औलादींना काय बोलावं. मला शिव्या देऊन दम आहे का विचारतात? अरे दम आहे म्हणूनच तर बोलत आहे ना? दम आहे म्हणून एक नाही दोन सांभाळतोय. दोन्हीलाही तीन लेकरं आहेत,”असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले आहे.

वाल्मिक कराड हे टोळी चालवत असून त्या माध्यमातून अनेक गैरकृत्य करतात. देशमुख यांच्या मारेकऱ्यांविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांनी पाळलेली माणसे सोशल मीडियाच्या माध्यमातून खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत, असा दावा देखील धस यांनी केला.

Dharashiv Morcha Suresh Dhas Statement

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राज्याचे राजकीय वातावरण तापू शकते. यापूर्वी सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल (Prajakta Mali) वादग्रस्त विधान केले होते. त्याप्रकरणी त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या :

Earlier, Suresh Dhas had made a controversial statement about Marathi actress Prajakta Mali. Even now he has made a controversial statement in Dharashiv.

Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now